मागील 27 दिवसांपासून मुंबई च्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) मध्ये भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) उपचार घेत आहेत. जानेवारी महिन्यात कोविड 19 ची लागण झाल्यानंतर न्युमोनिया बळावल्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता मंगेशकर यांनी कोविड 19 वर मात केल्याची माहिती दिली होती पण आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याचे ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल कडून सांगण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Lata Mangeshkar Health Update: जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक .
लता मंगेशकर यांना आज पुन्हा व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आल्याचं वृत्त समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वीच ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. चेहर्याला मास्क लावून हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले राज ठाकरे मीडीयाच्या कॅमेर्यात कैद झाले आहेत. राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
लता मंगेशकर या 92 वर्षीय आहे. कोविड 19 आजाराची लागण होताच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी उपचार करणार्या डॉक्टरांनी लता दीदींचं वय पाहता रिकव्हरी साठी वेळ लागेल त्यामुळे हितचिंतकांनी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. Dr Pratit Samdhani आणि त्यांची टीम लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. डॉ. सामदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांच्यावर आयसीयू मध्ये सध्या Aggressive Therapy दिली जात आहे आणि लता मंगेशकर सध्या ती सहन देखील करत आहेत. राज ठाकरेंनी सामदानी यांच्याकडूनही उपचाराची माहिती घेतली आहे.
Singer Lata Mangeshkar is in the ICU ward. She continues to be under aggressive therapy and is tolerating the procedures well at this moment: Dr Pratit Samdani, who is treating her at Mumbai's Breach Candy Hospital pic.twitter.com/RtqyxEwcVk
— ANI (@ANI) February 5, 2022
काही दिवसांपूर्वी लता दीदींच्या प्रकृतीबाबत खोडसाळ वृत्त सोशल मीडीयामध्ये वायरल होत होते. त्यावेळी त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंट वरून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले होते.