मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray यांना मुंबई-मांडवा रो-रो बोट (Raj Thackeray In Mumbai-Mandwa RoRo) प्रवासात बेकायदेशीररित्या धुम्रपाण (Raj Thackeray Smoking) केल्याबद्दल दंड आकारण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, हे वृत्त केवळ दिशाभूलच करणारे नव्हे तर पूर्णपणे चुकीचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले असून, संबंधित प्रसारमाध्यमांनी माफी मागावी असे म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सुरु करण्यात आलेल्या रो-रो सेवेचा राज ठाकरे यांनी आज अनुभव घेतला. या वेळी त्यांच्यासोतब नितीन सरदेसाई आणि आणखी काही लोक होते. महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे साथनियंत्रण कायदा लागू आहे. अशा स्थितीत मास्क वापरणे बंधणकारक आहे. असे असताना राज ठाकरे यांनी रो-रो बोट प्रवासादरम्यान आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला नव्हता. याशिवाय ते बोटीवरच्या मोकळ्या जागेत धुम्रपाणही करत होते, अशा आशयाचे वृत्त काही इंग्रजी आणि मराठी प्रसारमाध्यमांनीही दिले होते. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे मनसेने म्हटले आहे. (हेही वाचा, Raj Thackeray spotted on Mumbai-Mandwa RoRo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला मुंबई मांडवा रो रो बोट प्रवासाचा अनुभव !)
दरम्यान, कोरोना व्हायरस संक्रमन स्थिती हाताळण्याच्या बाबतीत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर अनेकदा टीका केली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या वेळीही राज ठाकरे उपस्थित होते. मात्र, तेव्हाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावर मास्क लावला नव्हता. प्रसारमाध्यमांनी त्याबाबत विचारले असता आपण सर्वांनी मास्क लावला आहे त्यामुळे मी मास्क नाही वापरला, असे उडवाउडवीचे उत्तर राज ठाकरे यांनी त्या वेळी दिले होते.