Raj Thackeray Birthday Special Bala Nandgaonkar Post (photo Credits: Facebook)

आज 14 जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Birthday)  यांचा वाढदिवस असल्याने मध्यरात्रीपासूनच अनेकनाकडून राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राज यांचे निकटवर्तीय सहकारी आणि मित्र बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar)  यांनी सुद्धा एक पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. राज आणि बाळा नांदगावकर यांची मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे, याच मैत्रीला भगवान कृष्णा सुदामाच्या मैत्रीची उपमा देत बाळा नांदगावकर यांनी आज पोस्ट लिहिली आहे. आज कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी कृष्णकुंजवर राज यांच्या भेटीला कोणीही येण्याचा हट्ट करू नये असेही सांगण्यात आले आहे, दरवर्षी होणारी ही प्रेमळ भेट यंदा कोरोनामुळे टळल्याने मनसैनिकांची 'साहेबा प्राण तळमळला' अशी अवस्था झाल्याचेही नांदगावकर यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.. (हे ही वाचा-Raj Thackeray Birthday: मनसे स्थापना दिन ते लोकसभा निवडणूक 2019 पर्यंत राज ठाकरे यांची आजवर गाजलेली भाषणे पहा; लाव रे तो व्हिडीओ!)

बाळा नांदगावकर यांची पोस्ट

"सुदामाचे राजधन" या नावाने नांदगावकर यांनी पोस्ट लिहिली आहे. "सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते.

मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखी "निष्ठा" आहे जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख "राजनिष्ठ" अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे "राजधन". योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा "कृष्णकुंज"च आहे

या लॉक डाउन मुळे आलेला दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू.आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन "तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए". अशा सुंदर शब्दात बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, काही वेळापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राज यांना शुभेच्छा देत खास ट्विट केले होते, वाद वादळातही टिकून राहते ते मित्रत्व असे म्हणत राऊत यांनी राज यांना शुभेच्छा दिल्या आहेत.