Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस आहे. यंदा महाराष्ट्रात कोरोनामुळे (Coronavirus In Maharashtra) ओढवलेल्या संकटाला पाहता राज यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्व मनसैनिकांना सुद्धा कुठेही पोस्टरबाजी किंवा शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये असे स्पष्ट आवाहन केले आहे.आज सकाळपासून मात्र सोशल मीडियावर सर्वत्र राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोणी राज यांचे फोटो तर कुणी त्यांच्या एखाद्या भाषणाची क्लिप शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आज राज ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांना भेट म्हणून आपण राज ठाकरे यांचे गाजलेली भाषणे पाहणार आहोत. मनसे स्थापन दिनापासून ते लोकसभा निवडणूक 2019 पर्यंत राज ठाकरे यांनी विविध प्रसंगी केलेली ही काही निवडक भाषणे तुम्हाला खाली पाहायला मिळतील. चला तर मग बघुयात तो व्हिडीओ.
मनसे स्थापना दिवस
मनसे जाहीर सभा 2008
CAA, NRC वर राज ठाकरे यांचं भाषण
राम मंदिर प्रकरणी राज यांची भूमिका
अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन वर राज यांचे भाषण
लाव रे तो व्हिडीओ (लोकसभा निवडणूक 2020)
राज ठाकरे यांनी भाषण कौशल्याच्या बळावर आजवर महाराष्ट्रात लाखो नागरिकांची मनं जिंकली आहे. राज यांच्या भाषणात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसून येते असेही अनेक जण म्हणतात. राजकारणात प्रत्यक्ष सत्तेत नसतानाही सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम राज यांच्या मनसे कडून केले जाते.
सुरुवातीला मराठी माणसाचा नेता म्हणून आणि आता नव्या भूमिकेसह हिंदुत्वाची कास धरून काम करणाऱ्या राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!