मुंबई शहरामध्ये येत्या 26 जानेवारीपासून मॉल, उपहारगृहं 24x7 सुरू ठेवण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई शहरात नाईट लाईफ सुरू करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईतील नाईट लाईफ समान्य मुंबईकर आणि लोकप्रतिनिधींकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. भाजपा नेते राज पुरोहित (Raj Purohit) यांनी मुंबई नाईट लाईफवर (Mumbai Nightlife) टीका करत यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वाढ होईल, निर्भया सारख्या बलात्काराच्या प्रकरणांसारख्या केसेस वाढतील असे म्हणाले आहेत. मुंबई मध्ये 27 जानेवारीपासून मॉल, उपहारगृह 24x7 सुरू ठेवण्यास परवानगी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय.
मुंबई या शहराची ओळख ही कधीही न झोपणारं शहरं अशी आहे. त्यामुळे मिल परिसरातील मॉल, उपहारगृह यापुढे 24 तास खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सामान्य मुंबईकरांच्या सेवेत हे शहर 24 तास खुलं राहील. लंडन, न्युयॉर्क शहराप्रमाणे मुंबई शहरालाही नाईट लाईफ़मुळे आर्थिक फायदा मिळू शकतो. अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी मीडीयाशी बोलताना, नाईट लाईफ़ म्हणजे क्लब आणि बार नव्हे असे त्यांनी म्हटलं आहे. मुंबई शहर जरी 24 तास खुले राहणार असले तरीही दारूची विक्री नियमांप्रमाणे रात्री 1.30 वाजता बंद होणार आहे.
ANI Tweet
Raj Purohit, BJP on Mumbai malls,eateries&pubs to remain open 24 hrs says Aaditya Thackeray: If a culture of 'alcohol' gets popular, it'll lead to increase in crime against women & there will be thousands of Nirbhaya cases. He should think whether such culture is good for India. pic.twitter.com/kK0jhwyc1D
— ANI (@ANI) January 21, 2020
मुंबईमध्ये संपूर्ण आठवडाभर 24 तास मॉल आणि हॉटेल्स उघडी राहू शकत नसली तरीही मॉल मालकांनी किमान विकेंडला ती ओपन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानं, उपहारगृह, मॉल 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय झाला असला तरीही तो दुकानदारांवर बंधनकारक नसेल.