Rains in Mumbai: मुंबईत मालवणी येथे दुमजली इमारत कोसळली; अग्निशमन दलाकडून मदत-बचाव कार्य सुरु
Building Collapsed | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत (Mumbai) मालाड (Malad ) परिसरातील मालवणी (Malvani) येथे असलेल्या दुमजली चाळीतील एक इमारत कोसळल्याचे (Building Collapsed at Malvani) वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे (Rains in Mumbai) ही इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. मदत आणि बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. इमारतीच्या मलब्याखाली काही निवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मातीच्या ढिगाऱ्यातून दोघांना बाहेर काढण्यात अले आहे. आणखीही काही लोक मातिच्या ढिगाऱ्याखाली असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

मुंबई शहरात आज मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. मान्सूच्या पावसाने पहिल्याच दिवशी मुसळधार सुरुवात केली. त्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणांवर पाणी साचले. रेल्वे आणि रस्ते वाहतूकही ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, मान्सून पावसापूर्वीच म्हाडाने मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अतिशय धोकादायक स्वरुपात असलेल्या 21 इमारतींचा समावेश आहे.

बुधवारी (9 जुलै) दिवसभर पावसाचा कहर पाहायला मळाला. प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्याच दिवशी पावसाने मुसळदार आगमन केल्याने मुंबईकरांची त्रेधातीरपीट तर उडालीच. परंतू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता आदी ठिकाणी मुंबई तुंबल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकल सेवा थांबली. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्याने रेल्वेसेवा थांबविण्यावाचून पर्याय नव्हता. रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली. प्रामुख्याने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. (हेही वाचा, What Is Red, Orange And Yellow Alert: रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय? ते कधी जारी केले जातात? जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, मुसळधा पावसाची संततधार पुढचे आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत म्हटले आहे की, पुढचे दोन ते तीन दिवस मुंबई आणि कोकण समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या ठिकाणी अलर्टही जारी केला आहे.