Rain in Mumbai: मुंबई शहरातील मुलुंड परिसरात पावसाचा मध्यरात्री शिडकाव
Rains | File image | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) शहरातील मुंलूड (Mulund) परिसरात पावसाचा हलकासा शिडकाव आज मध्यरात्री झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लॉकडाऊन (Lockdown) काळात घरात अडकलेल्या आणि उकाड्याने कासावीस झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईचे दमट हवामान आणि त्यात मे महिन्यातील उन्हाळा हा मुंबईकरांना दरवर्षीच घामाची आंघोळ प्रतिदिन घालणारा ठरतो. त्यात यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे मुंबई करांना यंदा तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. अशा स्थितीत यंदा वरुनराजा काहीसा प्रसंन्न दिसतो आहे.

Glen Coelho नावाच्या ट्विटर युजरने आपल्या @whatmankalia या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रात्रीच्या आंधारात पाऊस पडत असल्याचे दिव्यांच्या प्रकाशात दिसते. हा व्हिडिओ मुलुंड परिसरात असल्याचा या यूजर्सचा दावा आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पूष्टी करत नाही. (हेही वाचा, Monsoon 2020: येत्या 8 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता; मान्सूनपूर्व पावसाला लवकरच सुरुवात- हवामान विभागाची माहिती)

ट्विट

दरम्यान, येत्या 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजेच 8 जूनला मान्सून राज्याच्या दक्षिण भागातून प्रवेश करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढे 16 जूनपर्यंत हाच मान्सून राज्याचा उत्तर भागही व्यापून टाकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.