Photo Credit -X

Pune Rain: राज्यातील कोकण विभाग, मुंबई परिसरात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला( IMD Prediction)आहे. मान्सून(Monsoon)ची महाराष्ट्रात दमदार आगेकूच सुरु असताना पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली. पुण्यात पावसामुळे(Pune Rain) घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पुण्यातील लोहगाव परिसरातही खांद्यापर्यंत पाणी साचले होते. घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अक्षरश: अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. त्यांच्याकडून राबवण्यात आलेल्या मदतकार्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Weather Update Tomorrow: मान्सूनची जोरदार हजेरी, आज दमदार पाऊस; उद्याचे हवामान कसे असेल? घ्या जाणून)

पुण्यात शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरात विविध भागात पाणी साचले होते. पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात अजूनही पाणी साचलेले आहे. भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे दुकानातील सामानाचे नुकसान झाले. दुकानातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.