Rail Roko at Titwala Station: मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकात प्रवाशांचा तुटला संयम; रोजच ट्रेन उशिरा धावत असल्याने ट्रॅकवर उतरून रेल रोको (Watch Video)
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. चाकरमान्यांसाठी ही जीवनवाहिनी आहे. अनेकांचा दिनक्रम त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचवण्यासाठी ट्रेनच्या वेळेवर अवलंबून असतं. पण टिटवाळा स्थानकामध्ये (Titwala Station) आज प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रेल रोको आंदोलन (Rail Roko Aandolan)  केले आहे.

मुंबई लोकल उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकामध्ये ट्रॅकवर उतरून त्यांनी आंदोलन केले आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल उशिराने धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले होते. कसारा-सीएसएमटी लोकल टिटवाळा स्थानकामध्ये 8 वाजून 19 मिनिटांनी येणं अपेक्षित होते पण ही रोजचं उशिराने धावत असल्याने आज प्रवाशांच्या संयमाचा उद्रेक झाला. रोजच ट्रेन उशिराने येत असल्याने स्टेशन वर प्रवाशांची गर्दी होते. अनेकांना ऑफिस मध्ये लेट मार्क होतो. त्यामुळे या त्रासाला कंटाळून आज अखेर प्रवासी आक्रमक झाले. नक्की वाचा:  Mumbai Local Update: ब्रिटीशकालीन कारनाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 27 तासांचा ब्लॉक जाहीर .

प्रवाशांचे ट्वीट

रेल रोको आंदोलन

कसारा- सीएसएमटी लोकल आज उशिराने आल्याने प्रवासी ट्रॅक वर उतरले होते. यावेळेस त्यांनी 15 मिनिटं ट्रेन रोखून ठेवली होती. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रवाशांना दूर केले आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.