ST Bus (फोटो सौजन्य - फेसबुक)

रायगड (Raigad)  मध्ये वरंध घाटात (Varandh Ghat)  एका एसटी बसचा अपघात (ST Bus Accident)  झाला आहे. ही बस 50 फूट खोल पडून अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अंदाजे 15-20 प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना बाहेर काढून नजिकच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी मंत्री भरत गोगावले यांनी जखमींची भेट घेतली आहे.

वरंध घाटामध्ये अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली उतरल्याचं बघायला मिळालं आहे. ही घटना आज संध्याकाळी साडेचारच्या सुमाराची आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनीही मदतीचा हात देत जखमींना बस मधून बाहेर काढले आहे. दरम्यान हा वरंध घाट रायगड आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. नक्की वाचा: Car Falls Into Gorge At Varandha Ghat: वरंधा घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली कार; एकाचा मृत्यू, 8 जखमी .

अपघात झालेली एसटीची बस सुनेभाऊ गावातून महाडला येत होती. सध्या या बस अपघातामध्ये 15 जण जखमी आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. दरम्यान यात सुदैवाने कोणाचीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना सध्या महाडच्या ट्रॉमा केअर युनिट मध्ये दाखल करण्यात आले आहे.