कॉंग्रेस पक्षाला रायगड मध्ये दणका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माजी मंत्री रविंद्र पाटील यांचा भाजपा मध्ये प्रवेश
BJP VS CONGRESS| (Photo courtesy: archived, edited, representative image)

महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता 'दलबदलू'च्या सोयीस्कररित्या इतर पक्षांमध्ये उड्या मारण सुरू झालं आहे. रायगडचे (Raigad) माजी मंत्री रविंद्र पाटील (Ravindra Patil) यांनी काल रात्री उशिरा कॉंग्रेस (Congress) पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रविंद्र पाटील काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर पोहचले. त्यावेळेस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीमध्ये रविंद्र पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

रविंद्र पाटील 2004 पासून मंत्री आहेत. दिवंगत बॅरिस्‍टर ए. आर. अंतुले यांचे कट्टर समर्थक म्हणून रविंद्र पाटील यांची ओळख होती. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेणची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येणार नाही हे समजल्यानंतर नाराज रविंद्र पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीमध्ये आता शेकापचाही समावेश झाल्याने ही जागा शेकापच्या वाट्याला जाणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक उत्सुक उमेदवार भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हणाले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.