अलिबाग येथे घोडागाडीची समुद्रातून सफर, पशुप्रेमींनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

अलिबाग येथे घोडागाडीची सफर सध्या समुद्रातून केली जात आहे. मात्र या प्रकारावर पशुप्रेमींनी आक्षेप घेतला असून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. टांगेवाले घोडागीडतून पर्यटकांना खोल समुद्राच्या येथून किल्ल्यापर्यंत घेऊन जात असल्याचा प्रकार सुरु करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी घोड्यांनी असे समुद्राच्या पाण्यातून घेऊन जाण्यास मनाई आहे. परंतु असे असले तरीही बिनधास्तपणे समुद्रातून घोड्यांना घेऊन जाणे धोकादायक आहे. त्यामुळेच टांगेवाल्यांच्या विरोधात संपात व्यक्त केला जात आहे.

पशुप्रेमी विभागातील अधिकारी मितेश जैन यांनी या प्रकारावर उत्तर देत असे म्हटले आहे की, टांगेवाल्यांकडून करण्यात येणारा हा प्रकार अतिशय भयंकर असून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. खोल समु्द्रात घोडागाडी घेऊन गेल्यास आणि एखादा अपघात झाल्यास यासाठी कोण जबाबदार राहणार असा प्रश्न सुद्धा येथे उपस्थित केला आहे. मुंबईतील रहिवाशी करिश्मा शास्री ही नुकतीच अलिबाग येथे गेली असता तिने हा प्रकार पाहिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. घोडागाडी पाण्यात घेऊन जाणे चुकीचे असून त्यामधील काही घोड्यांना जखमा झाल्याचे ही दिसून आले.(भिवंडी येथे भटके कुत्रे मोकाट, एकाच दिवशी दहा मुलांना चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण)

 आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सागर पाठक यांनी असे म्हटले आहे की, स्थानिक पालिकेने याबाबत जाचपडताळणी करायला हली. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आता अलिबाग येथील बीचवरील घोड्यांची अवस्था कशी आहे हे पाहण्यासाठी जाणार आहेत.