कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढता धोका विचारात घेत भारत देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. यामुळे उपजिवीकेसाठी महानगरांमध्ये आलेल्या आणि हातावर पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल झाले. अशाच 250 स्थलांतरीत कामगारांना राहुल तरुण मित्र मंडळ असोसिएशनतर्फे (Rahul Tarun Mitra Mandal Association) आज (शुक्रवार, 3 एप्रिल) अन्नदान करण्यात आले. त्यापैकी एका कामगाराने सांगितले की, "मी कामाच्या शोधात येथे आलो होतो. सध्या आम्ही इथेच राहतो. आम्हाला अशाप्रकारे जेवण मिळते. मी सरकारला विनंती करतो की आमची मदत करा." हे स्थलांतरीत कामगार मुंबई येथील उड्डाणपुलाखाली सध्या वास्तव्यास आहेस.
लॉकडाऊन काळात कोणीही प्रवास करु नका, आहात तिथेच रहा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. तसंच जीवनावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार ठप्प करण्यात आले. रेल्वे, बस इत्यादी वाहतूकीचे मार्ग बंद करण्यात आले. काम नसल्यामुळे आलेली बेजरोजगारी आणि घरी परतण्यासाठी उपलब्ध नसलेला मार्ग या पेचात कामगार बेजार झाले. अशा स्थलांतरीत कामगारांना अन्न, निवारा मिळानासा झाला. दरम्यान अशा स्थलांतरीत कामगारांसाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. (महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO)
ANI Tweet:
Maharashtra: Rahul Tarun Mitra Mandal Association today distributed food to over 250 migrant workers living under a flyover in Mumbai amid #COVID19 lockdown. A worker says,"I came in search of work.We sleep here&get food like this(through distribution).I request govt to help us" pic.twitter.com/4q9wwPRTZQ
— ANI (@ANI) April 3, 2020
यापूर्वी लॉकडाऊनमुळे बेहाल झालेल्या अनेक कामगारांचे फोटोज, व्हिडिओज समोर आले होते. त्यानंतर सरकारकडून यांच्यासाठी विशेष पाऊल उचलण्यात आले. स्थलांतरीत कामगारांसाठी मदतकेंद्रे उभारण्यात आली असून त्याद्वारे त्यांच्या राहण्याची आणि अन्नाची सोय करण्यात येणार आहे.