Pune: पुणे जिल्हा परिषदेकडून कामाच्या अभिप्रायासाठी 'माझी झेडपी, माझा अधिकार' पोर्टल सुरू
Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

पुणे (Pune) जिल्हा परिषदेने सार्वजनिक कामांचे सामाजिक लेखापरीक्षण आणि एखाद्या कामाच्या अभिप्रायासाठी 'माझी झेडपी, माझा अधिकार' (Majhi ZP Majha Aadhikar) हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सार्वजनिक कामांचे सामाजिक लेखापरीक्षण करणे आणि कामाचा अभिप्राय प्राप्त करणे हा त्याचा उद्देश आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. प्रसाद म्हणाले की, नागरिक पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाइटच्या महालाभार्थी भागावर लॉग इन करू शकतात आणि 'माझी झेडपी, माझा अधिकार' या टॅबवर क्लिक करू शकतात.

पुणे जिल्हा परिषदेने राबवलेली कामे पाहण्यासाठी नागरिक तालुका आणि गाव निवडू शकतात, ते म्हणाले. प्रसाद पुढे म्हणाले की नागरिक टिप्पण्या आणि फोटोसह प्रतिक्रिया देऊ शकतात. जिल्हा परिषदेने केलेल्या कामांना ते स्टार रेटिंगही देऊ शकतात. या अभिप्रायाचा उपयोग जिल्हा परिषदेकडून कामांचे मूल्यमापन करण्यासाठी केला जाईल. हेही वाचा Sanjay Raut on BJP: संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना या विषयात भाजपने चोंबडेपणा करु नये- संजय राऊत

जिल्हा परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की पोर्टल प्रशासनातील मूलभूत बदल देखील दर्शवते कारण आजपर्यंत, बहुतेक सरकारी कार्यक्रम फक्त तक्रारी शोधतात. या कार्यक्रमाद्वारे, आम्ही जनतेच्या पैशातून केलेल्या कामांची प्रशंसा आणि तक्रारी या दोन्ही शोधत आहोत, ते म्हणाले.