पुणे: येरवडा जेल मधून दोन कैदी फरार; सोशल डिस्टंसिंग साठी उभारलेल्या तुरुंगाच्या शौचालायच्या खिडकीचा घेतला फायदा
Image For Representation (Photo Credits:

पुण्याच्या (Pune) येरवडा जेल (Yerawada Jail) मधून आज शनिवारी, 13 जून रोजी 2  कैदी फरार झाल्याचे समजत आहे.  येरवडा येथे कोरोनाच्या (Coronavirus)  वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगसाठी (Social Distancing) तात्पुरत्या स्वरुपात कारागृह उभारण्यात आले होते. याच कारागृहातून दोन कैदी शनिवारी पहाटे पळून गेले आहेत. या दोघांनीही बाहेर पाडण्यासाठी तुरुंगातील शौचालयांच्या खिडकीचा मार्ग निवडला होता. याबाबत तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांचा असून अद्याप हे दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. प्राप्त माहितीनुसार, हर्षद सय्यद आणि आकाश बाबुराव पवार अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा ताजे अपडेट्स

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कैद्यांना सोडून देण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टंन्सिग राखण्याच्या दृष्टीने तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका संस्थेच्या इमारतीमध्ये तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. मात्र आता या घटनेमुळे या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 1,01,141 कोरोना बाधित असल्याचे समजतेय. यापैकी 47796 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 3717 जणांचा कोरोनाविरुद्ध लढाईत बळी गेला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 11281 रुग्ण आढळले असून आजवर 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे दुसरीकडे 6379 जणांनी कोरोनावर मात केली आहे.