Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव वेगाने होत आहे. मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणाचा गतीही कमी झाली आहे. मिळेल तशा आणि उपलब्ध असलेल्या लसींच्या साठ्यानुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, पुण्यातही (Pune) उद्या (सोमवार, 10 मे) 111 केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या केंद्रावर कोणती लस उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

उद्या 111 केंद्रांवर 45 वयोगटातील व्यक्तींना लसी देण्यात येणार आहेत. त्यापैकी 101 केंद्रांवर कोविशिल्ड आणि 10 केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध आहे. कोवॅक्सिन उपलब्ध असलेल्या 10 केंद्रांवर 12 एप्रिल 2021 पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. तर कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर 22 मार्च 2021 पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिले जाईल. विशेष म्हणजे अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या 20 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

मुरलीधर मोहोळ ट्विट्स:

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही माहिती अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याच उद्देशाने मुंबईत ड्राईव्ह-इन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, लसीकरण जलद गतीने करण्याचा सरकारचा मानस असला तरी अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे त्यात अडथळा येत आहे.