पुणे शहरामध्ये आजपासून 23 जुलै पर्यंत दोन टप्प्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. दरम्यान यामध्ये आता उद्योग, आयटी कंपनी यांना 15% मनुष्यबळासह कार्यालयं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहेत. मात्र त्यासाठी एक विशेष पास दिला आहे. पुण्यात पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनं तपासून विनाकारण बाहेर पडलेल्यांवर कारवाई होणार आहे. मात्र यामुळेच आज सकाळी शिवाजीनगर परिसरामध्ये ट्राफिक जाम पहायला मिळालं आहे. पुण्यामध्ये दुचाकीवरून फिरण्याला नागरिकांची पसंती असते. पण आता कोरोना संकटकाळात सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहतुकीपेक्षा खाजगी वाहनांनी बाहेर पडण्याला पुणेकरांनी अधिक पसंती दाखवल्याने आता वाहतूक कोंडी पहायला मिळाली आहे. दरम्यान ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सहायक पुलिस निरीक्षक रणजीत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सार्या वाहनांची कसून तपासणी करत आहोत त्यामुळे हे ट्राफिक जॅम आहे. केवळ पास धारक आणि अत्यावश्यक सेवेमधील लोकांनाच पुढे प्रवासाची परवानगी दिली जाणर आहे. Lockdown In Pune: पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; जिल्ह्यात नेमके काय राहणार सुरु आणि काय बंद? घ्या जाणून.
दरम्यान हिंजवडी सारख्या आयटी हब म्हणून ओळखल्या भागात आजूबाजूच्या परिसरातून अनेक कर्मचारी येतात. आता पुण्यात लॉकडाऊन जरी असला तरीही नाकेबंदी, वाहनांची कसून तपासणी यामुळे रस्त्यांवर ट्राफिक जॅम आहे.
शिवाजीनगर परिसर ट्राफिक जॅम
Maharashtra: Traffic congestion at Shivajinagar area in Pune. Municipal Corporation has ordered lockdown in Pune in two phases from today to July 18, to control the spread of #COVID19. pic.twitter.com/g4CjpIH9bw
— ANI (@ANI) July 14, 2020
पुणे शहरामध्ये 14 जुलै त1 19 जुलै आणि 19 जुलै ते 23 जुलै असा दहा दिवसांचा लॉकडाऊन 2 टप्प्यांत पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 14 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर आता सकाळपासून नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. पुणे मध्ये काल (13 जुलै) रात्री पर्यंत पुणे मनपा मध्ये एकूण 29612 रूग्णांची नोंद आहे तर 897 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 6815 रूग्णांची नोंद आहे तर 123 मृत्यू नोंदवले गेले आहेत.