Pune Shocker: भोंदूबाबाच्या सांगण्यावरून महिलेला कोंबडीचं रक्त पिण्याची जबरदस्ती, सासर्‍याकडून लैंगिक अत्याचार; दोन जण अटकेत
CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये एका 33 वर्षीय महिलेने तिच्या पती आणि सासर्‍या विरूद्ध पोलिसांत धाव घेतली आहे. एका स्वयंघोषित बाबाच्या सांगण्यावरून या महिलेला कोंबडीचं रक्त (Chicken's Blood) पिण्यास जबरदस्ती केल्याचा   आरोप आहे. सोबतच तिच्या नवर्‍याचं नपुंसकत्व (Impotency) लपवण्याचा आणि सासर्‍याकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचं देखील तिनं म्हटलं आहे.

दरम्यान पतीची लैंगिक क्षमता कमी असल्याचं लपवताना तो इंजिनियर असल्याचं सांगून तिची दिशाभूल करण्यात आली. असं पोलिस तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या महिलेने तिला बाळ व्हावं म्हणून एका स्वयंघोषित बाबाने दिलेल्या सल्ल्यानुसार, कोंबडीचं रक्त पिण्याची जबरदस्ती केल्याचं म्हटलं आहे. सोबतच सासर्‍याकडून तिच्यावर दबाव असल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं आहे.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी देखील कारवाई करत पती आणि सासर्‍याला अटक केली आहे. पती हा डिप्लोमा इंजिनियर आहे तर पत्नी कडे बॅचलर्स डिग्री आहे. त्यांचे 30 डिसेंबर 2018 ला लग्न झालं आहे. त्यानंतर मागील 4 महिन्यांपासून ते वेगळे राहत आहेत. जितेंद्र कदम या पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून करण्यात आलेले सारे आरोप तपासले जात आहेत. यावरूनच दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. नक्की वाचा: Madhya Pradesh: महिलेवर काळीज पिळवटून टाकणारा अत्याचार; दिराला खांद्यावर बसवून, मारहाण करीत तब्बल 3 किमी चालवले (Watch Video) .

दरम्यान तक्रारददर महिलेच्या सासू, सासरे आणि पती वर आयपीसी 498(a), 354(a), 323, 504, 506, आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदार महिलेने 2018 पासून सासरच्या व्यक्तींकडून मानसिक आणि शारिरीक त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.