Pune Shocker: पिपंरीचिंचवड येथे दीराला पोलिसांत पकडून दिल्याच्या रागात पत्नीचा खून, दोघांना अटक, एक फरार
Crime (PC- File Image)

Pune Shocker: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एक पतीने भाऊ आणि जावे सोबत मिळून पत्नीचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी दिराला एका प्रकरणार पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून महिलेची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पुण्यातील पिंपरचिंचवड येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या हत्तेचा उलगडा केला आहे. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी पतीसह जावेला अटक केले आहे.  (हेही वाचा- मुंबईत BMC कर्मचाराने राहत्या घरात घेतला गळफास, सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण)

मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथे एका गुन्ह्यात मृत महिलेने तीन वर्षांपूर्वी दीराला पोलिसांकडे पकडून दिले होते. या गोष्टींचा राग संपुर्ण घराला आला होता.याचा सुड घ्यायचा ठरवत महिलेने संपवले. सुनंदा लक्ष्मण चव्हाण असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे.तर पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. तसेच दीर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण हा फरार झाला आहे. सुनंदाच्या हत्त्ये प्रकरणी तीचा भाऊ शाम नामदेव चव्हाण याने शिरगाव परंदवाडी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपींनी सुनंदा हीचा 16 जानेवारी रोजी सकाळी दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी चांदखेड येथील डोंगरावर पुरला. 16 तारेखाला सुनंदाचा माहेरी काहीच संपर्क होत नसल्याने माहेरच्या मंडळीनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सुनंदाच्या घरी धाव घेत तिचा शोध लावला. पती आणि जावेची चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी या प्रकरणी कंबर कसून चौकशी केली तेव्हा सर्व घटना समोर आली. या प्रकरणातील गणेश हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.