Pune Shocker: 32वर्षीय व्यक्तीने पत्नीचा खून करत तिच्याच साडीत मृतदेह गुंडाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा केला प्रयत्न; पोलिसांनी केली अटक
(Archived, edited, symbolic images)

पुण्यामध्ये (Pune) पत्नीचा खून करून तिला तिच्याच साडीमध्ये गुंडाळून मृतदेहाची विल्हेवाट केल्याप्रकरणी 32 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिस स्टेशन मध्ये तपास करणार्‍या पोलिसांकडून ही अटक झाली आहे. या व्यक्तीचं नाव राहुल ज्ञानोबा फडतरे (Rahul Dnyanoba Phadtare) आहे. तो हवेली मधील मंतरवाडीचा रहिवासी आहे.

राहुलवर 23 वर्षीय पत्नी विद्याचा खून केल्याचा आरोप आहे. राहुलने पोलिसांना फोन करून त्याला पत्नीचा मृतदेह आढळल्याचा फोन केला होता. दरम्यान त्यापूर्वी पत्नी बेपत्ता असल्याचंही त्याने भासवलं होतं.

Indian Express च्या रिपोर्ट्सनुसार, 21 मार्चच्या दुपारी राहुल फडतरे ने पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून आपली पत्नी गायब झाली होती आणि आता तिचा मृतदेह कात्रज बायपास रोड वर आढळला असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा:  Nagpur Shocker: पत्नीसह मुलीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत संपवलं जीवन .

तपास करणारे असिस्टंट इन्स्पेक्टर दिगंबर बिडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा मृतदेह साडीमध्ये गुंडाळला होता. सारा मृत साडीत असल्याने चेहरा पाहण्यासाठी, ओळख पटवण्यासाठी तो साडीतून बाहेर काढावा लागेल अशी परिस्थिती होती मग विद्याची ओळख पती राहुलला कधी, कशी पटली असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाची राहुल उत्तरं स्पष्टपणे देऊ शकला नाही. नंतर तपासात राहुलनेच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचा खून गळा घोटून केल्याचं आणि नंतर बॉडी गायब करण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने म्हटलं आहे.