Photo Credit- X

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. आता पुण्यातून वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी बलात्काराची अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील नांदेड शहरात एका व्यक्तीने आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार जवळजवळ 8 महिन्यांपासून सुरू होता. आई घराबाहेर पडल्यानंतर वडील मुलीवर अत्याचार करायचे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, वडिलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नांदेड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली. अहवालानुसार, मागील वर्षी मुलीच्या आई-वडिलांमध्ये भांडण झाले व ते काही विभक्त राहू लागले. यावेळी घरात 14 वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी वडील असे दोघेच होते.

यावेळी मुलीला धमकी देत मारहाण करत वडिलांनी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. याबाबत कुठेही वाच्यता न करण्यास सांगत तिला धमकी दिली. त्यानंतर य हा प्रकार सुरु राहिला. पुढे मुलीची आई नोव्हेंबरमध्ये घरी परत आली. मात्र ती कामावर गेल्यानंतर वडिलांनी मुलीवर अत्याचार करणे सुरूच ठेवले. फेब्रुवारीपर्यंत आरोपी स्वतःच्या मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवत होता. दोन दिवसांपूर्वी बालहक्क समितीने नांदेड सिटी परिसरात अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याची माहिती पुणे पोलिसांना दिली होती. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: Maharashtra Horror: पोटच्या मुलींवर बापाकडून बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात; पत्नीचाही छळ, आरोपीस सिंधुदुर्ग येथून अटक)

दरम्यान, याआधी मूळची उत्तर प्रदेशमधील मात्र सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका 17 वर्षीच्या मुलीवर तिचे वडील , काका आणि आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काॅलेजमधल्या विशाखा समितीच्या सदस्यांकडून समुपदेशन सुरू असताना तिने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली होती.