Pune Shocker: पुणे शहरातील गुन्हेगारी काही संपेना. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे एकीकडे नागरिक संतापले आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाच नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक (Arrest) केले असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- मंदिरात मुलीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी तामिळनाडूतील 70 वर्षीय पुजाऱ्याला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. एप्रिलपासून चौघेही एकमेंकांना ओळखू लागले. महाविद्यालयातून शिक्षक शिकवत असताना ही घटना उघडकीस आली. तरुणी वर्गात उदास होती. त्यावेळीस समुपदेशकांनी तिला विश्वासात घेतले आणि घटनेची माहिती मिळवून घेतली. या घटनेनंतर शिक्षकाने पुणे पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी पीडितेची चौकशी केली. चौकशीतून असं समोर आले की, चारही आरोपींशी ओळख ही सोशल मीडियाच्या माध्यामातून झाली. एप्रिलपासून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी बोलू लागले. काही दिवसांपूर्वी तीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलवले. चौघांन्ही पीडितेची जवळीक साधून तीच्यावर बलात्कार केला आणि तिथे त्यांनी तिचे अश्लिल व्हिडिओ बनवले.
या घटनेनंतर तरुणी नैराश्यात गेली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी या प्रकरणी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन जण हे अल्पवयीन मुले आहे. आरोपीवर बलात्कारासह आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.