Toll Plaza (Image: PTI)

पुणे-सातारा माहामार्गावर (Pune-Satara Expressway) असणाऱ्या खेड-शिवापूर टोलनाका बंद करण्यासाठी आज आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी कृती समितीला सर्व पक्षीय नेत्यांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. कृती समितीने खेड-शिवापूर येथील टोलनाका हटवावा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीत सुरु करावा अशी मागणी केली होती. पुणे-सातारा दरम्यानच्या महामार्गाच्या विस्ताराचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडले गेले आहे. पण या मार्गावर सतत टोल वसूलीच्या रक्कमेत वाढ करण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आज आंदोलन असल्याच्या कारणास्तव कोल्हापूर येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात रस्त्याचे काम पाहणारी कंपनी, टोल वसुली कंपनीचे अधिकारी आणि पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची एक बैठक पार पडली होती. त्यामध्ये स्थानिक लोकांच्या वाहनांसाठी 25 टक्के टोलमध्ये सुट देण्यात यावी असे म्हटले होते. पण यासाठी स्थानिकांना ओळपत्र दाखवावे लागणार ही अट घालण्याचत आली होती. परंतु कृती समितीने या प्रस्तावाला विरोध केला असून आज खेड-शिवापूर टोलनाक्याच्या येथे आंदोलन करण्यात येणार आहे.(जळगाव: शेतकऱ्याला वीज दिवसा मिळायला हवी, त्यासाठी काम सुरु आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

 आंदोलनादरम्यान वाहतुक कोंडींचा मनस्ताप प्रवाशांना होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 येथे वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून कोल्हापूर येथून पुण्याकडे येणारी वाहने खालील मार्गाने वळवण्यात आली आहेत.