पुणे शहरात मागील दहा वर्षातील उच्चांकी तापमान; पहा आज मुंबई, पुणे, अमरावती जिल्ह्यांमध्ये काय आहे तापमान
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Maharashtra Summer Temperature 2019:  महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस तर तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसत असल्याने विचित्र वातावरण बनलंआहे. मागील काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने उष्णता वाढत असताना हवामानातील आर्द्रता कमी होत आहे त्यामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे. पुण्यामध्ये सोमवारी (26 मार्च) दिवशी तापमान चाळीशी पलिकडे गेले होते. 40.2 अंशावर गेलेलं हे मार्च महिन्यातील गेल्या १० वर्षातील सर्वाधिक कमाल तापमान आहे. पुढील काही दिवस मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्येही उष्णता वाढणार आहे.

पुण्यामध्ये दिवसा आणि संध्याकाळीदेखील उष्ण वारे वाहत असल्याने सध्या पुणेकर वैतागले आहेत. राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याने उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती येथे 41.6 इतके नोंदवण्यात आले आहे. मुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स

आजचे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तापमान

मुंबई 35

पुणे 39

नाशिक 38

नागपूर 38

अमरावती 39

धुळे 39

सोलापूर 40

रत्नागिरी 32

पिंपरी चिंचवड 39

नुकतीच होळी झाली आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने पुढील 2-3 महिन्यात काय होणार? कसा प्रश्न सामान्यांना पडला आहे. उन्हाच्या तडाख्यापासून दूर राहण्यासाठी योग्य काळजी घेणं आहे. आहाराचं गणित सांभाळल्यास अनेक आजार, हीटस्ट्रोक, डीहायड्रेशनसारखे जीवघेणे त्रास कमी करण्यास मदत होईल.