मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. पुण्यात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरयेथे 67.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पर्वती, डेक्कन, पाषाण तसेच अन्य भागात जोरदार पावसाने या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वीर बाजी पासलकर पुल पाण्याखाली गेला आहे.
पाहा व्हिडिओ -
#Pune: Commuters stuck in rainwater on University Road near E-Square#PuneRain@PMCPune pic.twitter.com/D8Y2R3stwS
— Punekar News (@punekarnews) June 8, 2024
या जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असल्याने पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यात दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
पाहा व्हिडिओ -
#Pune: Heavy water logging on Baner Road near Sindhi society. Many vehicles are stuck.#Punerainpic.twitter.com/AXQYYMs9NZ
— Punekar News (@punekarnews) June 8, 2024
पाहा व्हिडिओ -
#Pune: Children play in flooded water outside Plywood in #TimberMarket #Pune #PuneRain #Waterlogging @PMCPune pic.twitter.com/ehJOGc33ud
— Punekar News (@punekarnews) June 8, 2024
जोरदार वारेआणि विजांच्या कडकडाटासह पुण्याला जोरदार पावसाने झोडपून काढले.मान्सून जिल्ह्यात दाखल झाला असून पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.