केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. त्याच दिवशी रात्री उशीरा कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. या घटनेला महिला उलटला नाही, तोच राणे कुटुंबियांची अडचण वाढवणारी माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि त्यांचा मुलगा नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) लूकआऊट सर्क्युलर (Lookout Circular) जारी केली आहे. कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांना पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे. त्यांनी 65 कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तक्रार नोंदवली होती.
आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी नितेश राणे आणि निलम राणे यांच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर फेकली शाई, भाजप नगरसेविकेसह दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra | A look out circular has been issued against BJP leader Nitesh Narayan Rane and his mother by Pune City Police on Sept 3, in a loan-related case in the DHFL matter.
— ANI (@ANI) September 9, 2021
आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आणि संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर नीलम राणे आणि नितेश राणे यांना लूकआऊट सर्क्युलर पाठवण्यात आली आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे. तसेच नियमाप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आली होती, असे पुणे गुन्हे शाखा आयुक्तांनी म्हटले आहे.