पुणे: कॉलेजमधील तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओला पोलिसांनी घडवली अद्दल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Getty Images)

पुणे (Pune) येथील एका कॉलेजमधील तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. तर तरुणींचे छेड काढणाऱ्या तरुणाचा मुलींना फार त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली. यावर पोलिसांनी त्या रोडरोमिओ तरुणाला भर कॉलेजमधील तरुण-तरुणींच्या समोर शिक्षा दिली.

राजगुरुनगर मधील हा प्रकार समोर आला आहे. कॉलेजमध्ये येणाऱ्या तरुणीचे छेड काढणे रोडरोमिओला महागात पडले आहे. याला अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी त्याला भर रस्त्यात सर्वांसमोर उठाबश्या काढण्यास सांगितल्या. तसेच तेथे उपस्थित असलेल्या अन्य तरुणांना सुद्धा कॉलेजमध्ये येणाऱ्या तरुणीची छेड काढू नये अशी तंबी दिली आहे.(मुंबई: ऑनलाईन बिअर खरेदी करण्याच्या नादामध्ये महिलेला 87 लाख रूपयांचा गंडा)

या घडलेल्या प्रकारामुळे रोडरोमिओचा सर्वांसमोर अपमानास्पद वाटले असणार हे नक्की. त्यामुळे अशा प्रकारचे वर्तन करायचे कशाला असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. तर यापूर्वी सुद्धा रस्त्यात तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना भररस्त्यात मारहाण केल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत.