ऑनलाईन बिअर खरेदी करण्याच्या नादामध्ये एका तरूणीने सुमारे 87 लाख रूपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. गूगल सर्चमध्ये मिळालेल्या एका नंबरवरून ऑनलाईन बिअर खरेदी केली होती. मात्र या व्यवहारदरम्यान युवतीने 87 लाख रूपये गमावले आहे. तरूणीने तक्रार केल्यानंतर आता पवई पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरूद्ध FIR दाखल करण्यात आला आहे.
दैनिक भास्करच्या मीडिया रिपोर्टनुसार, ऑनलाईन बिअर खरेदी दरम्यान फसवणूक झालेल्या तरूणीचं नाव राधिका आहे. साकीनाका येथे राहणारी राधिका विदेशी बॅंकेमध्ये काम करते. 17 ऑगस्ट दिवशी राधिकाला गूगलवर स्टार वाईनचा क्रमांक मिळाला. राधिकाने त्यावर फोन करून बिअरच्या 3 बॉटल्स ऑर्डर केल्या. त्यानंतर फोनवरूनच 420 रूपयांचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सांगितले. हे पेमेंट केवळ कार्ड, गूगल पे किंवा पेटीएमच्या माध्यामातून स्वीकारले जाईल असे सांगण्यात आले होते. राधिकाने गूगल पेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर तरूणाने यूपीआय आयडी मागितला. आरोग्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरेल बियर; फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल!
दुकानात गेल्यानंतर खोटा नंबर असल्याचं समजलं
राधिकाने आयडी मेसेज केल्यानंतर 420 रूपये ट्रान्सफर केले त्याला मंजुरीही मिळाली. मात्र त्यानंतर काही वेळातच 29 हजार 1 रूपये काढण्यात आले. त्यानंतरही फोन केल्यानंतर चुकून पैसे काढले गेले आहेत लवकरच ते रिटर्न केले जातील. मात्र वारंवार पैसे काढले गेल्यानंतर तीन वेळा तिच्या अकाऊंटमधून पैसे काढले गेले होते. याद्वारा एकूण 87 हजार रूपयांची अफरातफर झाली होती. जेव्हा राधिका दुकानात पोहचली तेव्हा तो फोन क्रमांक त्यांचा नसल्याचं दुकानदाराने सांगितले. फसवलं गेल्याचं लक्षात आल्यानंतर तरूणीने पवई पोलिस स्थानकामध्ये या प्रकरणाची तक्रार केली आहे.