पुणे पोलिसांनी (Pune Police) 19 मे च्या कल्याणी नगर (Kalyani Nagar) मधील पोर्शे कार अपघातातील (Porsche car crash Case) अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबांना अटक केल्यानंतर आता त्यांचे पाय अधिक खोलात बुडाले आहेत. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरूद्ध पोलिसांनी आता स्थानिक व्यवसायिकाच्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवला आहे.
PTI च्या रिपोर्टनुसार, पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील बांधकाम व्यवसाय करणारे डीएस कातुरे यांनी विनय काळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कातुरे यांचा मुलगा शशिकांत कातुरे याने काळे यांच्याकडून बांधकामासाठी पैसे घेतले. “कर्ज वेळेवर न भरल्याने काळे याने मूळ रकमेत चक्रवाढ व्याज जोडून शशिकांत कातुरे यांना त्रास देण्यास सुरुवात केली. सततच्या छळाला कंटाळून शशिकांत कातुरे यांनी या वर्षी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली होती,” असे ते म्हणाले.
तपासादरम्यान, आत्महत्या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील (एक बांधकाम व्यावसायिक), आजोबा आणि इतर तिघांची भूमिका समोर आली आहे. आम्ही आता या प्रकरणात आयपीसीचे कलम 420 (फसवणूक) आणि 34 लावल्याची माहिती दिली आहे. Sonali Tanpure On Pune Car Accident: 'त्या मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली,' पुणे अपघात प्रकरणानंतर Prajakt Tanpure च्या पत्नीचं ट्वीट चर्चेत .
Maharashtra | Pune Police have booked the Father and Grandfather of the Juvenile accused (involved in Pune car accident case) and three others in a separate case of abatement of suicide of a local businessman's son. The case was registered at Chandannagar Police station.
— ANI (@ANI) June 7, 2024
अल्पवयीन मुलाच्या आजोबांना सध्या कोर्टाने त्यांच्या कौटुंबिक चालकाचे अपहरण आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याच्या संशयास्पद सहभागाच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या वेळी तो ड्रायव्हिंग करत असल्याची खोटी कबुली पोलिसांसमोर देण्यासाठी चालकावर जबरदस्ती करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे
अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात, त्यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत, एका याचिकेद्वारे, अपहरण आणि त्यांच्या कौटुंबिक ड्रायव्हरला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवल्याच्या प्रकरणात त्यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आणि खोट्या प्रकरणात अडकवले गेले, असे नमूद केले आहे.