पुणे पोलिसांनी (Pune Police) बुधवारी 22 वर्षीय रिक्षाचालकाच्या अपहरण आणि हत्येच्या प्रयत्न प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मधील चिंचोली (Chincholi) भागातील आहे. हल्लेखोरांनी रिक्षाचालकाला त्रास देत त्याच्यावर हल्ला केला. त्याला लोखंडी रॉडने मारल्याचे हिंदुस्तान टाईम्सचे वृत्त आहे. रिक्षाचालकाच नाव महेश देवेंद्र येमगड्डी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या आत्महत्येचा बदला घ्यायचा होता, त्यांना वाटत होतं की त्याने ऑटोरिक्षा चालकामुळे स्वतःचा जीव घेतला.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, अटक केलेले आरोपी राजू लक्ष्मण देवारमणी, अक्षय शिवराज देवारमणी, शिवराज लक्ष्मण देवारमणी, वैभव सुरेश नाईक आणि दीपक दिलीप सौदे असल्याचं समोर आले आहे. सारे आरोपी देहू रोड येथील गांधीनगरचे रहिवासी आहेत. अद्याप पोलिसांकडून कुणाल काटरे या आरोपीचा शोध सुरू आहे. हे देखील नक्की वाचा: Pune: लहान मुलांच्या अपहरणाबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन, पालकांसाठी खास सुचना जारी .
20 सप्टेंबर दिवशी हा खून झाला आहे. रात्री 8 च्या सुमारास सारे आरोपी रिक्षाचालक महेशच्या घरी पोहचले. राजू या मुख्य आरोपीने त्याचे अपहरण केले. महेशच्या आई आणि भावाने जेव्हा आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानाही फटकारलं. रिक्षा घालून महेशला एका निर्जन स्थळी नेण्यात आले. तेथेही त्याच्यावर हल्ला करण्यात आला. कुणाल काटरे याने यावेळी महेश वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चाकूचा वार चुकून महेश तेथुन निसटला. पण हल्ल्यामध्ये तो जबर जखमी झाला.
महेशमुळे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने जीव गमावल्याची भावना आरोपींच्या मनात असल्याने त्यामधून हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये आरोपींविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासही सुरू असल्याची माहिती दिली आहे.