Pune Crime: महिलेकडून 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला पुणे पोलिसांकडून अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री आरटीआय कार्यकर्ते सुधीर आल्हाट (RTI activist Sudhir Alhat) यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात (Deccan Gymkhana Police Station) यापूर्वी संलग्न असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाविरुद्धची तक्रार परत घेण्यासाठी महिलेकडून  50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. कोथरूड येथील एका 48 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरटीआय कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट आणि त्यांचे साथीदार सुभाष उर्फ ​​अण्णा जेऊर, नीलेश जगताप आणि विवेक कोंढवे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2018 ते 2020 दरम्यान डेक्कन पोलिस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर महिलेने आल्हाटशी संपर्क साधला होता.

आल्हाटने तिला छळासाठी काही पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते आणि विभागातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना ओळखत असल्याचे सांगितले. आल्हाट यांनी शहराच्या एका उच्च पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क असल्याचा दावा केला आणि आतापर्यंत 32 अधिकार्‍यांना निलंबित केल्याची बढाई मारली. हेही वाचा Mumbai Cyber Crime: अंधेरीमधील व्यापाराला 18.51लाखांचा ऑनलाइन गंडा, एकास अटक

आल्हाट याने महिलेला पीएसआय सोनवणे यांच्या लेटरहेडवर तक्रार करण्यास भाग पाडले आणि आठ दिवसांत पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तिला घरी बोलावले आणि पैशाची मागणी केली. पैसे नाहा दिले तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची तिला जबानी धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे जाऊन या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पीएसआय दत्तात्रय काळे तपास करत आहेत.