Paytm (Photo Credits: ANI)

सध्या ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी विविध अॅप लॉन्च करण्यात आले आहेत. मात्र या अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. तर नुकत्याच पुणे येथे पेटीएम या अॅपच्या माध्यमातून केवायसी अपडेच्या नावाखाली 15 युजर्सला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये या अॅपबाबत भीती निर्माण झाली आहे.

तर सध्या बहुतांश प्रमाणात डिजिटल पद्धतीने एखादे बिल भरले जात आहे. मात्र पेटीएमसाठी काही जणांनी केवायसी अपडेट आल्यास जरा सावधच रहा. कारण केवायसी अपडेटच्या नावाखाली फोन येऊन पैसे चोरी केले जात आहेत. तर पेटीएम ब्लॉक झाल्याने केवायसी अपडेटसाठी तरुणीला फोन येत तिची पैशांबाबत फसवणूक करण्यात आली आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या व्यक्ती ग्राहकाकडून पेटीएम पासवर्ड आणि अन्य महत्वाची माहिती चालाखीने काढुन घेतात. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पेटीएम धारक असल्यास ही बाब जरुर लक्षात ठेवा. अतापर्यंत पेटीएम केवायसीच्या नावाखाली 15 जणांना गंडा घालण्यात आला असून 3-4 लाख रुपये लुबाडले गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे.(एका वर्षात पुणेकरांनी भरला तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का)

 तसेच पेटीएम वरील तुमच्या जुना पासवर्ड बदलून नवा ठेवावा असे आवाहन सुद्धा ग्राहकांना करण्यात आले आहे. कारण बहुतांश वेळेस ग्राहक काही कॉमन पासवर्ड ठेवतात. त्यामुळे हॅकर्सला सहज एखाद्या युजर्सचा डेटा चोरी करणे सोपे होते. त्याचसोबत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP सुद्धा एखाद्या व्यक्तीला शेअर करु नये असे ही वारंवार मेसेज द्वारे ग्राहकाला सांगितले जाते.