![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/Crime--380x214.jpg)
Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलगा हवा या लालची वृत्तीने एका व्यक्तीने आपल्या बायकोला आणि दोन चिमुकल्या मुलीचे जीवन संपवले आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार हडपसर येथे घडला आहे. मुलगा पाहिजे या हव्यासापोटी पतीने बायकोसोबत दोन मुलींची हत्या केली. मृत झालेल्या महिलेच्या सासूने मुलगा होण्यासाठी आणि तो गोरा होण्यासाठी सुरुवातीला वेगवेगळ्या गोळ्या खायला दिल्या, तरीही तीला दोन मुली जन्मल्या.अवघ्या सात महिन्याच्या चिमुकल्या मुलींची रात्री झोपेत हत्या केली.
जुळ्या मुलींना मारल्यानंतर मुलींच्या आईला कारने पौड रोडला घेऊन जात अपघात झाल्याचं भासवलं. यात जखमी झालेल्या जुळ्या मुलींच्या आईचा मृत्यू झाल्याचं बनावट चित्र तयार केलं होतं. हा भयानक प्रकार पुण्यातल्या हरपळे वस्ती फुरसुंगी परिसरात समोर आला आहे. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. हे सर्व खोटं असल्याचं माहेरच्या माणसांनी सांगितलेय. या घटनेमुळे मुलीच्या माहेरी दुखाचा डोंगर कोसळला. मृत झालेल्या महिलेच्या भावाने पोलीस या प्रकरणा दखल देत नसल्यामुळे थेट न्यायालय गाठलं.
अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी (वय ५५), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी अशी आरोपींची नावं आहेत.या प्रकरणात पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तपासणी करत आहे. हे प्रकरण २०२९ रोजी घडलं असताना या प्रकरणात न्यायालय आता सुनावणी करणार आहे. पुण्यातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री झोपण्याच्या आधी दोन्ही मुलींना बाहेरील दूधांत औषध मिक्स करून पाजल्याने दोघींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.