पुणे: झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी महापालिकेची 350 आरोग्य पथक सज्ज

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचचली जात आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. झोपडपट्टी आणि दाटवटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली आहेत. या माध्यमातून अधिक प्रमाणात आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (Dr. Deepak Mhaisekar) यांनी दिली.

पुणे शहरांमध्ये मागील 10 ते 15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना इतर विकार आहेत. त्यामध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अशा अनेक आजारामुळे ज्येष्ठ नागरिक करोना बाधित झाल्यानंतर त्यांच्यासाठी तो जीवघेणा ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्यामध्ये महापालिकेची 350 पथकं पाठविण्यात येणार आहेत. या पथकांकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून अनेक आजार असलेल्या रुग्णांचा तपासणी केली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. हे देखील वाचा- मुंबई: BMC च्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने 300 पेक्षा अधिक नर्सिंग होमला पालिकेकडून टाळं

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 27 हजार 892 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजार 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 8 हजार 068 वर पोहचली आहे. त्यांपैकी 342 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत.