कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'Pune Break The Chain' साठी पुणे महापालिकेकडून देण्यात आले सुधारित आदेश
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

पुण्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus Situation in Pune) संख्या झपाट्याने वाढत असून ही परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. दरम्यान पुणे महापालिकेने 'ब्रेक द चेन' (Break the Chain) अंतर्गत देण्यात काही सुधारित आदेश जारी केले आहेत. पुण्यातही करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. यामुळे येथील नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

या नव्या आदेशांमध्ये ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे यांची यादी जाहीर करण्यास सांगितली आहे. त्याबरोबर महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांना परवानगी दिली आहे. अश्या कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकानं त्याच कारणासाठी सुरु ठेवण्याची परवानगी असणार आहे. मात्र इतर किरकोळ विक्री करता येणार नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना नविन आदेशात करोना चाचणीतून सूट देण्यात आली आहे.हेदेखील वाचा- महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

घरपोच औषधं पोहोचवणारे कर्मचारी, हॉटेल, बार, रेस्टॉरंटमधील कर्मचारी, तसेच घरपोच सुविधा देणारे कर्मचारी, खासगी वाहतूक करणारे वाहन चालक-मालक, वर्तमानपत्र, मासिकं, साप्ताहिकं यांची छपाई आणि वितरण करणारे कर्मचारी, घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असण्याऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस आणि नर्स यांनी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण करुन घ्यावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.

तसेच, खानावळी या सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या वेळेत फक्त पार्सल सेवेसाठी सुरु राहतील. मद्य विक्रीची दुकानातून होम डिलिव्हरी सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत करता येणार आहे. चष्माची दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरु राहतील.