Naidu Hospital (Photo Credits: ANI)

कोविड-19 (COVID-19) चा वाढता प्रसार रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण देशात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यात लोकांना घराबाहेर पडू नये हा मह्त्त्वाचा संदेश वारंवार देण्यात येत आहे. मात्र काही वैद्यकीय उपचारांसाठी लोकांना रुग्णालयात जावे लागत आहे. अशा वेळी रुग्णालयात येणा-या लोकांना कोणत्याही विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पुणे महानगरपालिकेने महत्वपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. विषाणूजन्य आजारांकरिता प्रसिदध असलेल्या पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या (Naidu Hospital) प्रवेशद्वारजवळ लोकांना जंतुनाशक करण्यासाठी एक स्वच्छता कक्ष उभारण्यात आले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध नायडू रुग्णालयात वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी फार लांबून लोक येतात. अशा वेळी येथे येणा-या लोकांना कोणत्याही विषाणूची बाधा होऊ नये म्हणून PMC ने प्रवेशद्वाराजवळ हा स्वच्छता कक्ष उभारला आहे.

पाहा ट्विट:

हेदेखील  वाचा- कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मुंबई मधील 23 हॉस्पिटल्समध्ये अलगीकरण सुविधा; पहा हॉस्पिटल्सची संपूर्ण यादी

तर दुसरीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबई मध्ये अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्कतेने गोष्टी हाताळत आहे. तसंच खास खबरदारी सह वैद्यकीय सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मुंबई (Mumbai) मधील काही रुग्णालयात अलगीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. याची यादी महाराष्ट्र सीएमओ या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे.

तसंच कोरोनाच्या फैलावाला आळा घालण्यासाठी राज्यभरातील एकूण 18 जिल्ह्यांमध्ये 2455 पथके नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम करत असून त्या अंतर्गत 9 लाख 25 हजार 828 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही सर्व पथके सर्व वैद्यकीय उपकरणांसह सुसज्ज आहेत. ज्या भागात कोरोनाचे 3 किंवा त्याहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत तेथून साधारणपणे 3 किलोमीटर पर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जात आहे. पथकांना नेमून दिलेल्या भागांमध्ये 14 दिवस दररोज सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.