Photo Credit- X

 

Pune Municipal Commissioner on Ganeshotsav Preparations: पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. गणरायासाठी गणेश मंडळ मोठमोठे मंडप उभारताना (Ganeshotsav Preparation)दिसत आहेत. त्यावर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation)प्रकाश टाकत रस्त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेवर गणेश मंडळांचे लक्ष वेधले आहे. मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे केले जातात. मात्र, गणेश विसर्जणानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे छोटे खडे्डे जरी केले असले तरी त्यामुळे रस्त्ये जास्त प्रमाणात उखडले जातात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यावर आता उपाययोजना म्हणून गणेश मंडपांसाठी खोदलेले खड्डे भरण्याची जबाबदारी मंडळांची असेल असे महापालिका आयुक्तांनी (Pune Municipal Commissioner)म्हटले आहे. या कामातून जर मंडळांनी हात वर केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा कडक इशाराही त्यांनी मंडळांना दिला आहे.(Ganeshotsav 2024: आता गणेशोत्सवासाठी विमानाने कोकणात जाता येणार; केव्हापासून आणि कुठूण सेवा सुरू? घ्या जाणून)

पुणे महानगरपालिकेकडे मंडळांकडून खड्डे बुजवण्याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर प्रतिक्रीया देत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी गणेश मंडळांनी तयारी केल्यानंतर रस्ते पूर्ववत करणे ही त्यांचीच जबाबदारी असून, तसे न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा कडक इशारा दिला आहे.(Ganeshotsav 2024: जाणून घ्या कसा साजरा कराल पर्यावरणपूरक गणेशोत्सव; राज्य शासनाने जारी केल्या उपयुक्त टिप्स)

डॉ. भोसले यांनी गणेश मंडळांनी खड्डे खोदले असतील तर त्यांनी ते पुन्हा भरावेत आणि बाधित क्षेत्र पूर्वस्थितीत आणावेत यावर भर दिला. मंडळांनी या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, तसेच त्यांना पालिकेने दिलेल्या परवानग्या रद्द केल्या जाऊ शकतात, असा इशारा दिला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक खड्डे पडले असतानाच हा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, शहरातील विविध भागात अनेक जुने खड्डे पडले असून नवीन खड्डे पडत आहेत. रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन डॉ.भोसले यांनी खड्डे दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश रस्ते विभागाला दिले आहेत.

हवामानाची परवानगी मिळताच PMC खड्डे भरण्यासाठी केंद्रीत मोहीम सुरू करेल, असे त्यांनी नमूद केले. गणेश चतुर्थीच्या अगोदर ही मोहीम राबविण्यात येणार असून, असाच प्रयत्न अनंत चतुर्दशीच्या पाच दिवस आधी केला जाणार आहे. पावसाळा संपला की रस्त्यांची पूर्ण दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन डॉ.भोसले यांनी दिले.