Ganeshotsav 2024: यंदा गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी भरपूर मार्गाचा वापर केला जाऊ शकतो. कारण याआधीच ज्यादा बसेस आणि रेल्वे सज्ज करून ठेवल्या असून आता आणखी एक खुशखबर गणेशभक्तांना मिळत आहे. ती म्हणजे आता कमी वेळेत हवाई मार्गाने गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2024)कोकण किंवा गोवा गाठता येणार आहे. कारण गणेशोत्सवात कोकणकरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. मात्र, ही सेवा मुंबईहून नसून पुण्यातून सुरू(Flight Pune to Konkan) आहे. पुणे-गोवा आणि पुणे-सिंधुदुर्ग या दोन मार्गांवर विमानसेवा सुरू होत आहे. (Ganeshotsav 2024: मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी; जाणून घ्या काय आहेत निर्बंध)
फ्लाय 91 विमान कंपनीकडून या दोन्ही मार्गांवर शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असणार आहे. त्यामुळे आता अवघ्या तासाभरात पुण्यातून कोकणात पोहचता येणार आहे. पुणे-सिंधूदुर्ग-पुणे या विमान सेवेमध्ये फ्लाइट क्रमांक आयसी 5302 विमान पुणे विमानतळावरून सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणार आहे. ते नऊ वाजून दहा मिनिटांनी सिंधूदुर्ग विमानतळावर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.(Ganeshotsav 2024: जाणून घ्या कसा साजरा कराल पर्यावरणपूरक गणेशोत्सव; राज्य शासनाने जारी केल्या उपयुक्त टिप्स)
तर, फ्लाइट क्रमांक आयसी 5303 सिंधूदुर्ग-पुणे-सिंधूदुर्ग हे विमान सिंधूदुर्गहून सकाळी साडेनऊ वाजता सुटणार आहे. ही फ्लाईट पुण्यामध्ये सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.