Pune Metro | Twitter

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या नव्या पुणे मेट्रो (Pune Metro) मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते 6 मार्च रोजी उद्घाटन  हे करण्यात आले होते.  दरम्यान या मेट्रो मार्गाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मागिल चार दिवसात 52 हजारांहून अधिक प्रवाशांनी त्याचा वापर केला आहे. हे उद्घाटन 19 फेब्रुवारीला होणार होतं, पण पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने विलंब झाला. अखेर 6 मार्चरोजी अवघ्या काही सेकंदात कोलकात्यातून मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्यात त्यांना यश आले.  (हेही वाचा - Mumbai Local Mega Block March 10: रविवारी हार्बर रेल्वे लाईन वर ब्लॉक; पहा वेळापत्रक)

पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. 6 आणि 7 मार्च रोजी प्रवाशांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिल्याचे पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दोन दिवसांत 52 हजार 763 प्रवाशांची नोंदणी झाली. त्यातून 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल मिळाला.  ही मार्गिका रामवाडीला पीसीएमसी क्षेत्राशी आणि कोथरूड ते रामवाडीला जोडतो.

दरम्यान येत्या आठवडय़ात प्रवासी संख्येत वाढ होईल, असा अंदाज मेट्रोच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.  वनाझ ते रामवाडी या 15 किमी मार्गावर 15 स्थानके आहेत. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मार्गावर बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. पीसीएमसी ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा आणि वनाझ ते गरवारे कॉलेज या पाच किलोमीटरच्या भागाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 6 मार्च 2022 रोजी करण्यात आले होते.

तिकीट दर किती ? 

वनाज ते रामवाडी- 30 रुपये

रुबी हॉल ते रामवाडी- 20 रुपये