मध्य रेल्वेवर 10 मार्च दिवशी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. मानखुर्द ते नेरूळ मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या वेळेत ब्लॉक असेल. सीएसएमटी ते मानखुर्द या मार्गावर या काळात विशेष ट्रेन चालवल्या जातील. ट्रान्स हार्बर/ मेन लाईन वर तसेच  पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा  ब्लॉक नसेल. पण आज रात्री बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर  रात्री 11.30 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत आणि डाउन मार्गावर सकाळी 0040 ते 04.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)