महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात (Pune) हजारो कोटींच्या ड्रग्सचा पर्दाफाश करणार्या पुणे पोलिस (Pune Police) दलातील पथकाची भेट घेत त्यांना बक्षीस दिलं आहे. Rs 3,579 कोटीचे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी पथकाला 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. या ड्रग्स रॅकेट मध्ये इंटरनॅशनल कनेक्शन देखील होते. 19 फेब्रुवारी पासून सुमारे 10 जणांना या ड्रग्स रॅकेट मध्ये अटक झाली आहे. तर एकूण 1837 किलो ड्रग्स पुणे, सांगली आणि दिल्ली मधून जप्त करण्यात आले आहे. 24 फेब्रुवारीला फडणवीसांनी पुणे पोलिस कमिशनरांची भेट घेतली आहे.
पुण्यामध्ये हे मोठं ड्रग्स कनेक्शन हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंखे यांच्या टीप वरून उघड झाल्याने त्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. Mephedrone cartel मधील प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचा संशय असलेला भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक सुदीप धुने ऊर्फ सॅमसन याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इंटरपोल (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना) मार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पहा ट्वीट
ड्रग्स विरोधात पुणे पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद!
पुणे शहर पोलिस दलाने अंमली पदार्थ जप्तीच्या केलेल्या विक्रमी कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन व कौतुक केले. यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी व पुणे शहर पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सुमारे ₹3700… pic.twitter.com/a0FqcLaM8r
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2024
पोलीस ‘ब्राऊन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकन नागरिकाचा शोध घेत आहेत. ज्याची मेफेड्रोन रॅकेटमधील भूमिका तपासादरम्यान समोर आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कारखान्यात तयार करण्यात आलेले मेफेड्रोन दिल्ली आणि तेथून नेपाळ आणि देश-विदेशात अन्य ठिकाणी पुरवले जात असल्याचा संशयही पोलिसांना आहे.