पुणे-लोणावळा मार्गावर आज ब्लॉक; तीन लोकल्स रद्द
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Pune Lonavala Local Block: तांत्रिक कामासाठी पुणे-लोणावळा मार्गावर कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान आज रविवार (19 मे) रोजी ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे पुणे-लोणावळा मार्गावरील तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून लोणावळ्यासाठी जाणाऱ्या दुपारी 12:15, 1 आणि 3 वाजताच्या अशा तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लोणावळ्याहून दुपारी 2:50, 3:40 आणि सायंकाळी 5:15 वाजताची अशा तीन पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-लोणावळा रद्द झालेल्या लोकल्स:

दुपारी- 12:15, 1 आणि 3 वाजता

लोणावळा-पुणे रद्द झालेल्या लोकल्स:

दुपारी 2:50, 3:40 आणि सायंकाळी 5:15 वाजता

तसंच या ब्लॉकमुळे दुपारी 2:19 वाजताची लोणावळा-पुणे लोकल तळेगाव येथून पुण्याकडे प्रवास करेल. ही लोकल पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौंड मनमाड या मार्गाने धावणार आहे.