कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी काळात पुणे येथील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर (Shivajinagar Jumbo Covid Center Scam) कथीत घोटाळा प्रकरणी एका व्यक्ती अटक झाल्याचे समजते. राजीव साळुंखे (Sanjeev Salunkhe) असे या व्यक्तीचे नाव आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी साळुंखे यांना अटक झाल्याचा दावा ट्विटरवर केला आहे. मात्र साळुंखे यांना अटक झाल्यााबत अधिकृत माहिती मात्र मिळू शकली नाही. राजीव साळुंके हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे व्यावसायिक भागिदार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या ट्विटची दखल घेत प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, ''पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंडर घोटाळा. राजू साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. अजूनही तिघांना अटक होणे बाकी आहे. हे तिघे संजय राऊत यांचे पार्टनर आहेत. सुजित पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता, संजय जहा यांची अटक होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा बोगस कंपन्यांना कंत्राट दिले होते. तीन कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. कारवाई तर होणारच''. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचा लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे पार्टनर असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला असून त्यांना अटक करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना आजपासून नाकावाटे मिळणार कोरोनाची इन्कोव्हॅक लस; घ्या जाणून)
ट्विट
Pune Shivaji Nagar COVID Center Scam Raju Salunkhe arrested
Kirit Somaiya demands arrest of Sanjay Raut's Partner Sujeet Patker of Lifeline Hospital Management Services @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/bbn1SJcriw
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 1, 2023
दरम्यान, कोरोना महारामारी असतानाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोविड सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला गेला आहे. आजही भाजपकडून कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातो. याच आरोपांचा धागा पकडत किरीट सोमय्या उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीवर जोरदार टीका करताना पाहायला मिळतात. किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ईडी, सीबीआय आणि इतरही काही केंद्रीयय यंत्रणांकडे तक्रारी केल्या आहेत.