पुणे: Inox, PVR, Cinepolis मध्ये समोसे मिळणार नाहीत; अन्न व सुरक्षा प्रशासनाचे आदेश
Samosas (Photo credits: Instagram)

पुण्यामध्ये मल्टिप्लेक्सना पुरवठा करणार्‍या समोसा कारखान्यांवर अन्न व सुरक्षा विभागाने धाड घातल्यानंतर अस्वच्छता आढळल्याने आता समोसे उत्पादकावर उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. परिणामी आता पुणे, पिंपरी या भागातील Inox, PVR, Cinepolis सारख्या गर्दीच्या मल्टिप्लेक्समध्ये समोसे मिळणार नाहीत. एफडीएच्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात मल्टिप्लेक्सला पुरवले जाणारे समोसे अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणी बनवले जाता असे एफडीएच्या निदर्शनास आल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई करताना समोरे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.