Pune High Profile Sex Racket: पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, रशियाच्या दोन मॉडेल्स ताब्यात
प्रातिनिधिक प्रतिमा pc File image

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची आता ओळख बदलत चालली असून गुन्हेगारी आणि इतर दृष्कृत्यासाठी पुणे (Pune) हे ओळखले जात आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत राजस्थान इथल्या अभिनेत्रीला वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. सामाजिक सुरक्षा विभागानं (Pune Crime Branch) छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षात अभिनेत्रींकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.  (हेही वाचा -  Sharad Mohol: शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून आणखी तिघांना अटक )

या ठिकाणी राजस्थानी अभिनेत्रीसोबतच आणखी दोन रशियाच्या मॉडेल्सला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं समोर आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यातील विमाननगर भागात सापळा रचून ही कारवाई केली आली आहे.

पोलिसांनी एका लॉजवर छापेमारी करत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. तसंच वेश्या व्यावसायात गुंतलेल्या एका अभिनेत्रीसह दोन अन्य तरुणींची सुटका पोलिसांनी केली होती. सामाजिक सुरक्षा पथकानं ताथवडे परिसरातील लॉजवर छापेमारी करत ही कारवाई केली होती.