Sharad Mohol: शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून आणखी तिघांना अटक

शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता.

Sharad Mohol: शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून आणखी तिघांना अटक

पाच जानेवारीला सुतारदरा येथे राहत्या घराजवळ मोहोळ याचा गोळ्या झाडून खून (Pune Crime) करण्यात आला होता. पोळेकर आणि आणखी दोघांनी शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळ्या झाडल्या होत्या. शरद मोहोळ खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि पिस्तुलखरेदीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने अटक केली. आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - Sharad Mohol: शरद मोहोळच्या अंत्ययात्रेला तरुणांची गर्दी, बाईक-कारची रॅली)

शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी खैरे हा मुन्ना पोळेकरसोबत तेथे हजर होता. या प्रकरणात पैशाची संपूर्ण व्यवस्था खैरे याने केली होती. गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे पुरवले होते.

दरम्यान, खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही सहभाग आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2024 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).