Pune Fire in Saree Centre (Photo Credits-ANI)

पुणे (Pune) येथील ऊरळी देवाची मधील एका साडी सेंटरला भीषण आग लागल्याची घटना आज (9 मे) पहाटे घडली आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परंतु आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.(Mumbai Fire: अंधेरी येथील इमारतीमध्ये सिलेंडर ब्लास्ट मुळे भडकली आग, 2 जखमी)

तर आता पर्यंत एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मात्र भीषण आगीप्रकरणी अधिक माहिती देण्यात आलेली नाही आहे.