Pune Fire: पुणे येथील कुरकुंभ MIDC भागातील केमिकल फॅक्टरीला आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
Pune FIre (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) येथील कुरकुंभ एमआयडीसी (Kurkumbh MIDC) भागात असलेल्या एका केमिकल फॅक्टरीला (Chemical Factory) आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. हा कारखाना रासायनिक उत्पादनांचा आहे. दरम्यान आग मोठी असून मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट परिसरात पसरले आहेत.

आग लागल्याची घटना समजताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले. धुराच्या लोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने काही काळ परिसरात धुराची सावली मोठ्या प्रमाणावर पडल्याचे दिसले. दरम्यान, अद्यापही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याने 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात सरकारने काही प्रमाणात शिथीलता देत एमआयडीसी परिसरातील उद्योग सुरु करण्यास सशर्थ मान्यता दिली आहे. असे असले तरी अद्यापही एमआयडीसी पूर्णपणे सुरु होऊ शकली नाही.