पुणे येथील इंजिनअर तरुण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी करणार अर्ज
Gajanan Hosale (Photo Credits-ANI)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस (Congress) पदाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. त्यामुळे आता पुणे (Pune) येथील एका इंजिनअर तरुणाला काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भुषवण्यासाठी उद्या (23 जुलै) अर्ज करणार आहे. गजानन होसाळे (Gajanan Hosale) असे तरुणाचे नाव असून पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. तसेच एका खासगी कंपनीमध्ये गजानन काम करत आहे.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काही गोष्टी फक्त बोलल्यामुळे किंवा स्वत:हून बदलणार नाहीत. त्यासाठी एका अध्यक्षाची गरज आहे. जर मला काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भुषवण्याची संधी मिळाल्यास ते उत्तमरित्या पार पाडू शकतो आणि त्यामध्ये पारदर्शकता असेल असे मत व्यक्त केले आहे.(राजू शेट्टी यांचं महाआघाडीबद्दल मोठं विधान; राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा समावेश असेल तरच महा आघाडीमध्ये येणार)

तसेच काँग्रेस पक्षातून अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी उत्तम कामगिरी करणे महत्वाचे आहे. त्याचसोबत पक्षाला वयाने तरुण असलेला नाही तर मनाने आणि विचाराने तरुण असलेल्या अध्यक्षाची गरज असल्याचे म्हटले आहे.