Dapodi Accident| Photo Credits: Twitter/ ANI

पुण्यामध्ये रविवार (1डिसेंबर) पिंपरी चिंचवड मधील दापोडी (Dapodi)ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कर्मचार्‍यांना वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानांवरही मातीचा ढिगारा कोसळून दुर्दैवी अपघात घडला आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तिघांना वाचवण्यासाठी अजून 3 जवान खड्ड्यांत उतरले मात्र दुर्देवाने त्यापैकी एका जवानाचा अंत झाला. विशाल जाधव असं त्या जवानाचं नाव असून या प्रकरणी चौकशीसाठी 2 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. दापोडी: ड्रेनेजचे काम चालू असताना, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या 5 पैकी दोघांचा मृत्यू

पुण्यामध्ये मागील 6 तासांपासून बचाव कार्य सुरू होते. यामध्ये 4 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून काही जखमींवर उपचार सुरू आहेत. दापोडीमध्ये पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजजवळ खड्डा खोदण्याचं काम सुरू होते. यामध्ये सुरूवातीला एक जवान खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून आणखी एक मोठा खड्डा खणण्यात आला त्यादरम्यान मातीचा ढिगारा कोसळल्याने ही दुर्घटना झाली.

केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेंतर्गत पुण्यात ड्रेनज लाइन टाकण्याचे महापालिकेकडून ठेकेदारामार्फत मागील काही दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. सुमारे 30 फूट खोल, 5 फूट रुंद तर 30 फूट लांब असा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात काम करताना जमादार व त्याचा एक सहकारी माती अंगावर पडल्याने गाडले गेले. त्यामुळे या दोघांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी उड्या मारल्या मात्र नंतर या दुर्घटनेत मदतीसाठी पोलिस प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या कर्मचार्‍यांनाही पाचारण करण्यात आले आहे.